होय रामाचा जन्म नेपाळ मध्येच झाला होता
- lokpatra2016
- Jul 26, 2020
- 1 min read

पंतप्रधान के पी ओली यांचा पुनरुच्चार
पीटीआय
रामाचा जन्म अयोध्येत नाही तर नेपाळ मधील सध्याच्या थोरी या गावात झाला होता.रामाची माता कौशल्या ही नेपाळ मधील कोसल राज्याचा राजा भानुप्रत याची कन्या होती . त्या काळातील सप्तसिंधूंच्या प्रदेशातील १६ महाजनपदांपैकी कोसल हे एक महाजनपद होते.कौशल्येचा विवाह राजा दशरथ याच्याशी झाला .त्यापासून कौशल्येला राम हा पुत्र झाला.पण रामाचा जन्म अयोध्येत नव्हे तर कोसल राज्यातील थोरी या ठिकाणी कौशल्येच्या माहेरात झाला.त्यामुळे अयोध्या ही रामजन्मभूमी नाही या दाव्याचा पुनरुच्चार नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी केला आहे.
इतकेच नाही तर भारतातील अयोध्या ही दशरथाची राजधानी नव्हती असे ओली यांनी म्हटले आहे .भौगोलिक दृष्ट्या तत्कालीन अयोध्या सुद्धा नेपाळ मध्येच होती.सध्या वीरगंज या ओळखले जाणारे शहर म्हणजेच जुनी अयोध्या आहे.असे ओली यांनी म्हटले आहे .येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील अयोध्येत नियोजित राम मंदिरांचा मुहूर्त होणार आहे त्यासाठी राम मंदिर निर्माण ट्रस्टने देशातील ३०० मान्यवरांना निमंत्रित केले आहे .या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी केलेल्या विधानामुळे प्राचीन भारताच्या अभ्यासकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून भाजपने ओली यांच्या
Comments