कोश्यारी वेंट ऑफ द शिवनेरी
- lokpatra2016
- Aug 17, 2020
- 1 min read

ना शिवजयंती,ना काही विशेष औचित्य अथवा निमंत्रण.महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाने तांडव मांडलेले असताना आमचे उमदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चक्क शिवनेरीवर चढाई करून गेले.सोबत त्यांचा राजभवनातील सुरक्षा रक्षक,डॉक्टर,सेवक,वाहन चालक,शिवाय राज्यपाल येणार म्हटल्यावर पुणे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या शिवनेरी मोहिमेत सामील झाले.हा सगळा जमाव शंभराच्या वर होता अशी माहिती आहे.राज्यपालांना अचानक उठून शिवनेरीवर जाण्याची सुबुद्धी कशी काय झाली याचे कोणतेही स्पष्टीकरण कोश्यारींनी दिले नाही.मात्र डोक्यावर संघाची काळी टोपी,धोतर-झब्बा,जाकीट आणि पायात कॅनव्हासचे बूट अशा परिवेशात कोश्यारी पायथ्यापासून माथ्यापर्यन्त शिवनेरी चढून गेले.यावेळी त्यांनी शिवरायांच्या कार्य कर्तृत्वाचे गुणगान करताना शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकीय फायदे उठवणाऱ्या आणि प्रत्यक्षात शिवाजी महाराजांच्या विचारांना पायदळी तुडवणाऱ्या वारसांना कानपिचक्या दिल्या आहेत.त्यांचा निर्देश वांशिक वारसावर असेल तर आज घडीला शिवरायांचे दोन्ही वारस भाजपात आहेत.त्यांना विचारांचा वारसा म्हणायचे असेल तर मग कोश्यारींनी अवघ्या महाराष्ट्रालाच बोल लावला आहे.ते असो पण कोश्यारींच्या डोक्यात अचानक शिवनेरी कसा काय आला हे काही उमजलं नाही.
===============
Comments