डॉक्टर तर देवदूत उपमर्द करण्याचा हेतू नव्हता संजय राऊत
- lokpatra2016
- Aug 17, 2020
- 1 min read

मुंबई /प्रतिनिधी
डॉक्टर तर या पृथ्वीतलावरील देवदूतच असतात.मी डॉक्टरांचा अजिबात उपमर्द केलेला नाही.तसा माझा हेतूही नव्हता.परंतु सगळेच तांदूळ धुतलेले नसतात.कोण बरा कोण वाईट हे कसे ठरवायचे ? उडदा माजी काळे गोरे कसे निवडायचे ? हा प्रश्न आहे.म्हणून मी डॉक्टर सर्वज्ञ नसतात,कम्पाउंडरलाही अनुभवाने बरेच काही कळते.बरेचसे काम कम्पाउंडरच करतात असे आपण म्हणालो.यात डॉक्टरांचा उपमर्द करण्याचा हेतू नव्हता असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याची टीका त्यांनी केली. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बोलताना राऊत यांनी, 'मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं' असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात सोशलमिडीयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत असे सांगत माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असे म्हटले आहे.कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केले. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी डॉक्टरांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांचे लोक काही विशिष्ट डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. मात्र माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि उपहासात्मक विनोदातील फरक समजून घेतला पाहिजे,असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-----------------------
नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत.त्यांना रुग्णसेवेत रस नसून औषधे विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता,
Comments