राजीव गांधींची मारेकरी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
- lokpatra2016
- Jul 21, 2020
- 1 min read

वेल्लोर /वृत्तसंस्था
माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे.गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे. नलिनीचं तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झाले होते. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेले. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवले जावे अशी मागणी केली आहे.२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टेची सदस्य असलेल्या नलिनी हिने प्रचारसभे दरम्यान आपल्या साथीदारांसह मानवी बॉम्ब द्वारे हत्या केली होती.याप्रकऱणी नलिनी आणि तिच्या पतीसहित एकूण सात जणांना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रुपांतर करण्यात आले आहे.
コメント