मराठा-दलित वाद निर्माण करू पाहणाऱ्या आणि मराठा समाजातील मुलींच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यास
- lokpatra2016
- Jun 16, 2020
- 2 min read

मराठा-दलित वाद निर्माण करू पाहणाऱ्या आणि मराठा समाजातील मुलींच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करा - मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील
मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
औरंगाबाद / प्रतिनीधी दि.१५
पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकारणात मराठा-दलित वाद निर्माण करू पाहणाऱ्या आणि मराठा समाजातील मुलींच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे समाजकंटक यांच्या विरोधात साइबर क्राइम अंतर्गत लोकांची चौकशी करुण कारवाई
करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी
मुख्यमंञी,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,पोलीस महानिरीक्षक,प्रधानसचिव,गृहविभाग,यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .सध्या राज्यातील पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकरण खूप गाजत असून सदर प्रकरणात दोषी असणारे आरोपीना शासन व्हावे यासाठी मराठा समाजातील कोणीही कसल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही.सदर प्रकरणी कायदेशीर योग्य ती प्रक्रिया चालू असताना काही समाजकंटक ह्या घटनेच्या आधारे मराठा-दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा जानिवपूर्वक प्रयत्न करत आहेत.या प्रकारणाला जातीय रंग देऊन अत्यंत भडक अश्या प्रकारची धमकी व चितावनीखोर पोस्टर्स विशिष्ठ समाजाकडून वायरल केली जात आहेत.याशिवाय tiktok या मनोरंजन एप्प वर मराठा समाजातील तरुणीच्या बाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करुण त्याना बदनाम करण्याचा व त्यांचे चरित्रहनन करुण त्यांचा विनयभंग करण्याचे प्रकार सरास सुरु आहेत.काही मोजक्या विशिष्ट समाजातील अश्या प्रवृतींच्या मुळे राज्यातील सामाजिक ऐक्य धोक्यात आलेले आहे.समाजातील अश्या जातिवाद पसरवणाऱ्या आणि समाजातील महिलांच्या बाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याना साइबर क्राइम अंतर्गत कडक शासन करुण कारवाई करण्यात यावी.याशिवाय सोशल मिडीयावर याप्रकरणी मराठा समाजाची भूमिका मांडणाऱ्या तरुणाना एट्रोसिटी गुन्हे दाखल करण्याच्या दिल्या जाणाऱ्या धमक्या म्हणजे सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करुण मराठा समाजाची बदनामी केली जात आहे याबाबत राज्यातील सामाजिक आणि कायदेशीर व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अश्या समाजकंटक लोकांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून भविष्यात अश्या प्रकाराना आळा बसावा याकरीता कडक शासन होणे आवश्यक आहे.प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास अन्याया विरूद्ध न्याय मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या वतिने पुन्हा राज्यभर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल.
याप्रकरणी प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन योग्य ति कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील,अप्पासाहेब कुढेकर,भरत कदम,पंढरीनाथ गोडसे,शुभम केरे,किरण काळे पाटील,लक्ष्मण मोटे,राहुल पाटील,अशोक मोरे,दत्ता भोकरे,शुभम खानजोडे,तेजस पवार आदींनी केली आहे.
.
Comments