मारुती सुझुकी अल्टो चा सलग १६व्या वर्षी भारताची सर्वाधिक विक्रीची कार म्हणून लौकिक कायम
- lokpatra2016
- Jun 16, 2020
- 2 min read

मारुती सुझुकी अल्टो चा सलग १६व्या वर्षी
भारताची सर्वाधिक विक्रीची कार म्हणून लौकिक कायम
१६ जून २०२० : मारुती सुझुकी अल्टो सलग १६व्या वर्षी भारताची सर्वाधिक खपाची कार ठरली आहे. सप्टेंबर २००० मध्ये बाजारात दाखल झाल्यापासून अल्टो च्या लोकप्रियतेचा आलेख सतत चढता राहिला आणि भारतात कार खरेदी करणा-या ग्राहकांच्या अभिमानाचे अल्टो हे एक प्रतीक बनले आहे. अल्टो ने आपल्या या वीस वर्षांच्या प्रवासात २००४ मध्ये भारताची सर्वाधिक खपाची कार हा मान मिळवला आणि आज १६ वर्षे छोट्या गाड्यांच्या अत्यंत चुरशीच्या बाजारपेठत ती सतत आघाडीवर आहे.
भारतीय कार ग्राहकाच्या सतत उंचावणा-या अपेक्षांना पुरे पाडण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा अल्टो मध्ये सतत होत गेल्या आहेत. आधुनिक परंतु आटोपशीर डिझाइन ड्रायव्हिंग ची सुलभता आणि इंधनाचा किफायतशीर वापर तसेच सुधारित सुरक्षितता यंत्रणा आणि आरामशीर बैठक यामुळे अल्टो हुकुमाचा एक्का बनली. स्टायलिश रूप आणि त्यामागे असलेली मारुतीच्या सुझुकी ची विश्वासार्हता यातूनच नवी अल्टो ही एक आकर्षक खरेदी ठरते.
अल्टो च्या या खास यशाबद्दल मारुती सुझुकी च्या मार्केटिंग आणि सेल्स विभागाचे कार्यकारी संचालक श्री शशांक श्रीवास्तव म्हणाले, अजोड परफॉर्मन्स, सुबक डिझाइन, चालवण्याची सहजता, किफायती इंधन वापर, परवडणारी किंमत आणि सुरक्षित ड्रायव्हिंग ही अल्टो ची बलस्थाने आहेत. या बळावरच अल्टो देशभर सर्वत्र ग्राहकांना पसंत पडते आणि प्रथमच कार खरेदी करणा-यांपैकी ७६ टक्के ग्राहकांची पसंती तिलाच असते.
नव्या एअरो एज डिझाइन आणि अद्य यावत सुरक्षितता यंत्रणा यामुळे अल्टो चा मालक असणे ही ग्राहकांना कायम अभिमानाची भावना असते. एंट्री लेव्हल-पहिली कार या क्षेत्रात बीएस सिक्स मानक समाविष्ट करणारी अल्टो ही पहिली कार आहे. पेट्रोल अल्टो प्रति लिटर २२.०५ किलोमीटर तर सीएनजी अल्टो प्रति किलो ३१.५६ लिटर चालते.ड्रायव्हर साठी एअर बॅग, एबीएस आणि इबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हाय स्पीड ऍलर्ट सिस्टीम आणि ड्रायव्हर व त्याच्या शेजारचा प्रवासी यांना सीटबेल्ट लावण्याचा इशारा देणारी यंत्रणा ही वैशिष्ट्ये प्रत्येक अल्टो मध्ये असतात. पादचा-यांची सुरक्षितता आणि धडक बसून होणारे अपघात यासंबंधीचे सर्व निकष अल्टो पूर्ण करते.

Comentários