top of page
Search

मी पुन्हा राजकारणात परतणार नाही.-हर्षवर्धन जाधव

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 23, 2020
  • 4 min read

कन्नड, (प्रतिनिधी ) राजकारणातू निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी कोचीन येथे जाणार होतो परंतु कोविळ-१९ मुळे व माझ्या सोबत महत्वाची घटना घडल्यामुळे मला पिशोर येथे राहण्यास यावे लागले.माझी आई यपूर्वीच पिशोर येथे राहण्यास आलेली आहे.म्हणून आईला सोबत व्हावी व राजकारणा पसून थोडे दूर जाता यावे यासाठी पिशोर येथे राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. पिशोर येथे मी छोटसं घर सुद्धा बांधण्याचा निर्णय घेतला आहे .कदाचित या निर्णयामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे असे काही लोकांना वाटेल परंतु मी पुन्हा राजकारणात परतणार नाही असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी (ता.२२) सोमवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन जाधव हे  वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे.यामध्ये अनेक वैयक्तिक बाबींचा त्यांनी खुलासा केलेला आहे.यात ते राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी पूर्वीही सांगितले होते कदाचित कन्नड तालुक्यात पिशोर येथे राहायला आल्यानंतर काही राजकीय मंडळींना असे वाटू शकते की, मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे परंतु मी राजकारणापासून पूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवले आहे. यानंतर मी कुठलीही स्थानिक स्वराज्याची निवडणूक लढविणार नाही किंवा आमदारकी सुद्धा लढविणार नाही. माझ्यापासून राजकीय फायदा होईल म्हणून कोणी माझ्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यांनी मला कृपया भेटू नये.परंतु माझ्या आमदारकीचा अनुभवाचा कुणाला फायदा होत असेल किंवा समाजासाठी उपयोग होत असेल तर सामाजिक कार्यात मी सर्वतोपरी मदत करेल. कारण हे माझे कर्तव्य सुद्धा आहे ज्या जनतेने माझ्या कुटुंबाला जे प्रेम दिले आहे ते परत फेडणे हे माझे कर्तव्य आहे. आता माझी स्वतःची व माझ्या आईची तब्येतीची काळजी ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. मध्यंतरी मला खूप नैराश्य आले होते, मी आत्महत्याच्या निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचलो होतो परंतु मी त्यातून आताच सावरलो आहे.प्रत्येकाचे खाजगी व व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे असतात तसेच माझे सुद्धा आहे माझी राजकीय आणि वैयक्तिक जीवन हे वेगवेगळे गोष्टी आहे.माझ्या राजकीय भूमिका आता पूर्णपणे संपलेला आहे. या नंतर माझी कुठलेही वक्तव्य ही राजकीय टीकाटिपणी किंवा राजकीय आरोप म्हणून कुणीही गृहीत धरू नये. सामाजिक भावनेतून व एक नागरिक म्हणून मी ते बोललो आहे असे समजावे. मागे एका वेळी मला तालुक्याचे आमदार म्हणाले होते की, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला घेईल.म्हणून त्यांना सांगावेसे वाटते की मुख्यमंत्री हे शिवसेनेची आहे आमदारमहोदय आपण सुद्धा शिवसेनेचे आहात म्हणून तालुक्यासाठी आपण याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. कृपया उपदेश कुठल्याही राजकीय भावनेतून केलेला  नसून एक नागरिक या नात्याने मी बोलत आहे. याचा कुठलाही राजकीय गैरअर्थ कुणीही काढू नये किंवा मी कुठलीही टीका आमदार महोदयांवर करीत नाही हे पुन्हा निक्षून सांगत आहे. येणाऱ्या काळात संजना जाधव यांच्या पाठीशी माझ्या मतदारांनी उभे राहावे,घरगुती कलह हा विषय हा विषय वेगळा आहे माझा राजकीय विषय आता संपलेला आहे.असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली .कन्नड येथे आलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य जाधव सुद्धा होता.

कन्नड, (प्रतिनिधी ) राजकारणातू निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी कोचीन येथे जाणार होतो परंतु कोविळ-१९ मुळे व माझ्या सोबत महत्वाची घटना घडल्यामुळे मला पिशोर येथे राहण्यास यावे लागले.माझी आई यपूर्वीच पिशोर येथे राहण्यास आलेली आहे.म्हणून आईला सोबत व्हावी व राजकारणा पसून थोडे दूर जाता यावे यासाठी पिशोर येथे राहण्याचा निर्णय मी घेतला आहे.पिशोर येथे मी छोटसं घर सुद्धा बांधण्याचा निर्णय घेतला आहे .कदाचित या निर्णयामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे असे काही लोकांना वाटेल परंतु मी पुन्हा राजकारणात परतणार नाही असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी (ता.२२) सोमवार रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन जाधव हे  वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे.यामध्ये अनेक वैयक्तिक बाबींचा त्यांनी खुलासा केलेला आहे.यात ते राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी पूर्वीही सांगितले होते कदाचित कन्नड तालुक्यात पिशोर येथे राहायला आल्यानंतर काही राजकीय मंडळींना असे वाटू शकते की, मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे परंतु मी राजकारणापासून पूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवले आहे. यानंतर मी कुठलीही स्थानिक स्वराज्याची निवडणूक लढविणार नाही किंवा आमदारकी सुद्धा लढविणार नाही. माझ्यापासून राजकीय फायदा होईल म्हणून कोणी माझ्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यांनी मला कृपया भेटू नये.परंतु माझ्या आमदारकीचा अनुभवाचा कुणाला फायदा होत असेल किंवा समाजासाठी उपयोग होत असेल तर सामाजिक कार्यात मी सर्वतोपरी मदत करेल. कारण हे माझे कर्तव्य सुद्धा आहे ज्या जनतेने माझ्या कुटुंबाला जे प्रेम दिले आहे ते परत फेडणे हे माझे कर्तव्य आहे. आता माझी स्वतःची व माझ्या आईची तब्येतीची काळजी ही माझ्यासाठी सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. मध्यंतरी मला खूप नैराश्य आले होते, मी आत्महत्याच्या निर्णयापर्यंत सुद्धा पोहोचलो होतो परंतु मी त्यातून आताच सावरलो आहे.प्रत्येकाचे खाजगी व व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे असतात तसेच माझे सुद्धा आहे माझी राजकीय आणि वैयक्तिक जीवन हे वेगवेगळे गोष्टी आहे.माझ्या राजकीय भूमिका आता पूर्णपणे संपलेला आहे. या नंतर माझी कुठलेही वक्तव्य ही राजकीय टीकाटिपणी किंवा राजकीय आरोप म्हणून कुणीही गृहीत धरू नये. सामाजिक भावनेतून व एक नागरिक म्हणून मी ते बोललो आहे असे समजावे. मागे एका वेळी मला तालुक्याचे आमदार म्हणाले होते की, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला घेईल.म्हणून त्यांना सांगावेसे वाटते की मुख्यमंत्री हे शिवसेनेची आहे आमदारमहोदय आपण सुद्धा शिवसेनेचे आहात म्हणून तालुक्यासाठी आपण याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. कृपया उपदेश कुठल्याही राजकीय भावनेतून केलेला  नसून एक नागरिक या नात्याने मी बोलत आहे याचा कुठलाही राजकीय गैरअर्थ कुणीही काढू नये किंवा मी कुठलीही टीका आमदार महोदयांवर करीत नाही हे पुन्हा निक्षून सांगत आहे. येणाऱ्या काळात संजना जाधव यांच्या पाठीशी माझ्या मतदारांनी उभे राहावे,घरगुती कलह हा विषय हा विषय वेगळा आहे माझा राजकीय विषय आता संपलेला आहे.असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली .कन्नड येथे आलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य जाधव सुद्धा होता.

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page