बंगळुरूमध्ये आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे हिंसा
- lokpatra2016
- Aug 12, 2020
- 1 min read

बंगरुळु /वृत्तसंस्था
आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून मंगळवारी रात्री बेंगळुरूमध्ये हिंसाचार उफाळला. पोलिस स्टेशनला आग लावण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात २ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ६० हून अधिक पोलिस जखमी झाले. यामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.शहरातील डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलिस स्टेशन भागात हिंसाचार झाला. सध्या येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण बंगळुरूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत ११० लोकांना अटक करण्यात आली आहे.कॉंग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांचे पुतणे नवीन यांनी एका विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे समाजातील लोक संतापले. आयुक्त कमल कांत म्हणाले की, आरोपी नवीनला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उपद्रवी व्यक्तींवर कारवाई केली जाईल.असे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या गोळीबारात २ ठार, ६० जखमी
Comments