फेरीवाला सर्वे ऑनलाइन जाहीर करा,
- lokpatra2016
- Aug 11, 2020
- 1 min read

सर्व फेरीवाल्यांना 10,000/- रुपयांचे कर्ज द्या- शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन सलग्न आयटक
औरंगाबाद दि . 10 ऑगस्ट; फेरीवाला स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या बैठकीत शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन सलग्न आयटक व नॅशनल हाॅकर्स फेडरेशन चे अॅड अभय टाकसाळ यांनी शहरातील पथविक्रेत्यांचा झालेला सर्वे ऑनलाइन जाहीर करा व उर्वरीत सर्वे सुरु करा, सर्व फेरीवाल्यांना कर्ज योजनेचा लाभ द्या अशी मागणी केली .अतिरिक्त आयुक्त तथा उपायुक्त, मनपा, औरंगाबाद
तथा पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAV NIDHI) या योजना क्षेत्रीय
सनियंत्रण समिती सदस्य सचिव
तथा शहर प्रकल्प अधिकारी, मनपा श्री रविन्द्र निकम यांचे प्रमुख उपस्थितित झालेल्या बैठकीत शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन सलग्न आयटक तर्फे फेरीवाल्यांची बाजु मांडण्यात आली . आजपर्यत औरंगाबादेत 860 अर्ज जमा झाले आहेत अशी माहीतीही एन यु एल एम विभागाचे भारत मोरे यांनी दिली . औरंगाबाद . प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योडनेअंतर्गत आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत 10,000/- रुपयांच्या कर्ज योजना अंमलबजावणीसाठीच्या बैठकीस शहिद भगतसिंग हॉकर्स युनियन (आयटक संलग्न) व नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या प्रतिनिधींना आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद पञासह निवेदनाद्वारे पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAV NIDHI) योजनेच्या पान क्र. 1 वरील पात्रतेच्या परिच्छेद 4 प्रमाणे सर्व्हेमधील फेरीवाल्यांना आय टी बेस्ड् प्लेटफॉर्म तयार करून विक्री प्रमाणपत्र व ओळखपत्र तातडीने अपलोड करावेत, कोरोनापुर्वी सर्व्हे सुरु झाला होता तो कोराना काळात थांबलेला आहे. सर्व्हेचा विभागवार वेळापत्रक जाहीर करून उर्वरित सर्व्हे करण्याचे आदेश द्यावेत व जसजसा सर्व्हे होईल तसा तो ऑनलाईन आय टी बेस्ड् प्लेटफॉर्मवर अपलोड करीत राहण्याचेही आदेश द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे .या निवेदनावर अॅड. अभय टाकसाळ,
राष्ट्रीय सहसचिव, नॅशनल हॉकर्स फेडरेशन (NHF) विजय रोजेकर,
सहसंघटकनॅशनल हॉकर्स फेडरेशन (NHF),इ च्या सह्या आहेत .
コメント