पडळकर अंडरग्राउंड !
- lokpatra2016
- Jun 25, 2020
- 1 min read

शरद पवार यांच्या संदर्भांतील वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत संतापाचा उद्रेक
मुंबई /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे संदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून अनेक ठिकाणी पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.यावेळी काही ठिकाणी पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.गाढवावरून धींड देखील काढण्यात आली.सोशल मीडियावरूनही पडळकर यांच्या वक्तव्याचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या संदर्भात भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाद मिटवण्या ऐवजी आगीत तेलच टाकण्याचा प्रयत्न केला.पडळकर यांचा पवार यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता असे अत्यंत बेजाबदार विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे विधान पडळकर यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर पडळकर धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत अस्वस्थ आहेत,त्यातून असे वक्तव्य आलेले असेल असे म्हणून जखमेवर मीठच चोळण्याचा प्रयत्न केला.दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून गोपीचंद पडळकर नॉट रिचेबल आहेत.
Comments