top of page
Search

*निसर्ग*... .

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 17, 2020
  • 1 min read

*निसर्ग*...

ree


*निसर्गाच्या विलोभनीय रुपी*

*अंबरी कृष्णमेघांची दाटी,*

*धो-धो बरसल्या जलधारा*

*वसुंधरा सुवासिनीच्या ओटी.* 

..

*निसर्गाची अघटित किमया*

 *उजळे जग हे क्षणभरी,*

*सोनपिवळ्या किरणांची वृष्टी*

*उदय नवचैतन्याचा भूवरी.*....


*खळाळती बाई ओढे -नाले*

 *फुलल्या पानोपानी कुमुदिनी*,

*भाळी रविबिंब टिळा ल्याली* 

*सजली नटली  सुवासिनी.*.


*वृक्षवेलींच्या झुपकेदार कुंतली*

  *गंध  प्राजक्त  जाई जुई*,

*सौदामिनीच्या चंद्रकोरी*

 *हिरव्या शालूत अवनी बाई.*..


*दवबिंदुंचे रत्न पाचू*

*पानापानातून लखलखती*

*जाती सुखावून मने*

*निसर्ग सानिध्यात एकांती.*


*निळ्या नभाचा डोई पदर*

 *शृंगाराचा सजला साज,*

*किणकिणली हिरवी कंकणे*

 *अवनी मेघांचे खोलत राज*...


     *पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे*

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page