निला सत्यनारायण गेल्या प्रशासनांतील सर्वोच्च पद महसूल विभागाच्या सचिव व नंतर राज्याच्या तडफदार मुख्
- lokpatra2016
- Jul 18, 2020
- 2 min read

निला सत्यनारायण गेल्या प्रशासनांतील सर्वोच्च पद महसूल विभागाच्या सचिव व नंतर राज्याच्या तडफदार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार पाहिलेली व्यक्ती
ह्या कोरोना मुळे गेल्या !
माझ्या मते आज ही जी काही लोक कोरोना हा ऐक साधा अपडेटेड न्यूमोनिया आहे , साधा संसर्ग आहे , षडयंत्र आहे , मेडिकल घोटाळा आहे हे असे मेसेज विडिओज पसरवत आहेत आणी लोकांची भीती घालवत आहेत त्यामुळे लोक बिनधास्त वागत आहेत अशा मुर्ख लोकां मुळेच हेच वाढले आहे
आधी मुंबई चे सहायक आयुक्त , मग नीला सत्यनारायण , असंख्य डॉक्टर्स , कित्येक पोलिस हे बळी पडले पण अजुन ही काही लोकांना हा मेडिकल घोटाळाच वाटत आहे अशा पोस्ट्स फिरवल्या मुळेच खूप लोक निर्धास्त झाली परिणामी ते बळी पडले कोरोना हे ऐक ज्वलंत वास्तव आहे ते स्वीकारल पाहिजे
4-5 केसेस होतात , हलगर्जीपणा सगळी कडेच असतो मग सरसकट सगळी कडेच तेच षडयंत्र सुरू आहे कुठले तरी विडिओ बघायचे पोस्ट वाचायच्या मग त्याला दुजोरा देत बसायचे आणी आजून इतर लोकांना त्यात पटवून द्यायचे मग ते अजुन इतरांना घाबरू नका बिनधास्त रहा असा सांगायच हे किती योग्य आहे ❗
काही नाही हो सगळा घोटाळा आहे टेन्शन घेऊ नका ' मेडिकल स्कॅम आहे , किडनी रॅकेट आहे ' अपडेटेड न्यूमोनिया आहे , हल्क घ्या अशा पोस्ट्स मुळेच पेशंट वाढले आहेत
भारताच ऐकून अर्थकारण थांबल आहे
हॉटेल्स , रेल्वे , बसेस , सलुन्स , चित्रपटग्रह , मॉल्स , मंगलकार्यालय , सगळ सगळ डूबल आहे हजारो लाखो लोक घरी बसले आहेत आता ह्या सगळ्याची उलाढाल काही हजार लाख करोडोत आहे मग फक्त मेडिकल घोटाळा होऊ द्यावा म्हणून काही करोड साठी हजारो करोड चा उत्पन्नस्त्रोत बंद झाले असा मानन किती हास्यास्पद आहे
कोरोना खरच खूप धोकादायक आहे पण योग्य काळजी नाही घेतली तरच तो आपला डाव साधतो
बाकी लोकांनी चालू ठेवा आपला हा मेडिकल घोटाळा असल्याच डफली !
कोरोनाची भीती बाळगू नका पण हलक्या मध्ये पण घेऊ नका ❗
📌बरं जी लोक हॉस्पिटल्स ला कोरोना होऊन परत येत आहेत त्या पैकी एकाने ही आज वर हा मोठा घोटाळा आहे हे ठाम पणे सांगितलेल नाही आहे
16 तास 18 तास सलग ड्यूटी करणाऱ्या डॉक्टर्सच हे खचीकरन आहे !
Abhijit Waghmare⭕
Comentarios