top of page
Search

धनंजय मुंडे कोरोनामुक्त

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 22, 2020
  • 4 min read

मुंबई /प्रतिनिधी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते ब्रीचकँडी रुग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे .१२ जून रोजी धनंजय मुंडे व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे.

============

पीएफचा व्याजदर आणखी कमी होणार नवी दिल्ली /वृत्तसंस्था सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीएफ ) व्याजदर सात टक्क्यांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. पीएफचा व्याजदर इतक्या निचांकी पातळीवर जाण्याची इतिहासातील  ही पहिलीच वेळ आहे. पुढील आठवड्यात २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच जुलै-सप्टेबर या कालावधीसाठी नवीन व्याजदर लागू केले जाऊ शकतात. या तिमाहिच्या नव्या व्याजदरानुसार पीपीएफचा व्याजदार कमी झाल्यास हा ४६ वर्षातील नीचांक असेल. छोट्या बचत योजनांना दहा वर्षांच्या सरकारी बॉण्डची सुरक्षा आहे. प्रत्येक तीन महिन्याच्या सुरुवातीला पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनासोबतच अन्य सरकारी योजनाचा व्यजदर ठरवला जातो. सध्या पीएफवर ७.१ टक्के व्याजदर मिळतोय. एप्रिल ते जून पर्यंतच्या तिमाहिचा व्याजदर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ठरवण्यात आला होता. याआधी जानेवारी ते मार्च या तिमाहिचा व्याजदर ७.९ टक्के होता.याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनावरही मोठी कपात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आपल्या बचतीवर ८.६ टक्केंवरून ७.४ टक्के व्याज मिळत आहे. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर १.१० टक्के व्याज कमी झाले असून या अंतर्गत गुंतवणूकदारांना ६.८ टक्के व्याज मिळतेय. यामध्ये जुलै ते सप्टेबरच्या तिमाहिमध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे.  छोट्या बचत योजनांनाच्या व्याजदरात नेहमीच कपात केली जाते. बँकमध्ये जमा रक्कमेचा व्याजदर कमी होत असतो. एफडीच्या व्याज दरामध्येही झपाट्याने घट झाली आहे. एसबीआय सध्या सात ते ४५ दिवसांच्या जमा रकमेवर २.९ टक्के व्याज देत आहे. जो सेव्हिंग्ज खात्तयावर मिळणाऱ्या २.७ टक्के व्याज दरापेक्षा थोडीसी जास्त आहे. पीएफ खात्याचा मॅच्योरिटीचा कालावधी १५ वर्ष असतो, ज्यामध्ये वर्षाला ५०० रुपये आणि जास्तित जास्त एक लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.

कोरोनाने नाही तरी हे कोरोनाचेच बळी ! औरंगाबाद शहरात २० दिवसात १८ आत्महत्त्या औरंगाबाद /प्रतिनिधी कोरोनामुळे गेले ९० दिवस औरंगाबाद शहर व परिसरात कधी कडक तर कधी शिथिल लॉक डाऊन चालूच आहे. अनेक कंपन्या आस्थापना उद्योग व्यवसाय बंद किंवा ठप्प आहेत.अनेकांचे काम सुटले आहे.एकीकडे रोज कोरोनाबाधित वाढत आहेत,कोरोना मृत्यूची संख्याही वाढत आहे.त्यातच कोरोनाने नाही पण कोरोनामुळे मागील २० दिवसांत तब्बल १८ जणांनी आत्महत्त्या केल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यात प्रामुख्याने तरुणवर्ग अधिक आहे.   सिडको एन-७ मधील प्रतीक्षा काळे ही २५ वर्षीय तरुणी शिक्षिका म्हणून एका खासगी शाळेत अध्यापनाचे काम करत होती. घरी काही विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होती. मात्र, शाळा सुरू नसल्याने तिचे वेतन बंद झाले होते. शिवाय वडिलांनी खासगी सावकारां कडून  घेतलेल्या पैशांचे व्याजही देणे शक्य होत नव्हते. सावकारांचा तगादाही वाढला. या तणावाच्या परिस्थितीत तणावात येऊन प्रतीक्षाने १८ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या बहिणीने सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अशोक गायकवाड व अंबादास संतोष सिरसाट या खासगी सावकारीशी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      दुसऱ्या घटनेत सतीश खंडाळकर या माथाडी कामगाराने कंपनीने वेतन कपात केल्याच्या ताणातूनच १२ जून रोजी आत्महत्या केली. खंडाळकर हे एका बिअरच्या कंपनीत काम करायचे. याप्रकरणी कंपनी प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माथाडी कामगार संघटनेचे नेते सुभाष लोमटे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत केली आहे.यासह किरण पारखे, सुरजित ठाकूर, करण बोरसे, अण्णासाहेब कोलते, या कामगारांनीही आत्महत्येसारखा मार्ग निवडला. किरण गाडगे या भाजीविक्रेत्यानेही घर चालवणे शक्य नसल्याने गळफास लावून आत्महत्त्या केली. समाधान राठोड या एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने, विवेक पानखडे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने, तेजस जाधव या राज्यस्तरीय पातळीवर बास्केटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या तरुण खेळाडूनेही मरणाला कवटाळले. बजाजनगरातील आंचल तायडे या तरुणीने गळफास लावून घेतला. मुकुंदवाडीतील मोहन सरोदे, पडेगाव शिवारातील शेख मोहसीन, टाकळी माळी येथील गणेश बुरकूल, सिडकोतीलच विशाखा चव्हाणसह पाचोड येथील संपत म्हस्के  या तरुणाने आत्महत्या केली. संपत मुंबईहून गावी आलेला होता. त्याचे घरातच विलगीकरण करण्यात आले होते.  कोरोनामुळे भविष्य अनिश्चित झाले असून आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वाद, यातून निर्माण झालेल्या ताणतणावातूनच मरणाला जवळ केले जात असल्याचे या घटनांमधून दिसत आहे. ================

आधार लिंकसाठी उरले फक्त आठ दिवस मुंबई /प्रतिनिधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी वाढवून देण्यात आलेली शेवटची तारीख अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३० जून २०२० पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.आयकर विभागाने जारी केलेल्या नव्या सूनचेनुसार ज्या व्यक्तींनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल त्यांना पॅन कार्ड वापरताना अडचणी निर्माण होऊ शकतील. आधार कार्डशी लिंक नसणारे पॅन कार्ड हे निष्क्रिय म्हणजेच रद्द केल्याप्रमाणे असतील असेही आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. आयकर विभागाच्या नियमांनुसार मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करता आयकर विवरण भरता येण्याची भूभा देण्यात आली आहे. मात्र आय़कर विवरणाचा अर्ज भरला असला तरी जोपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले जात नाही तोपर्यंत तो अर्ज आयकर खात्याकडून विचाराधीन घेतला जाणार नाही.३० जूनपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर १ जुलैपासून पॅन कार्डचा काहीच उपयोग करता येणार नाही. पॅनकार्ड असून नसल्यासारखेच होईल. तसेच नवी नियमांनुसार पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. मात्र पुन्हा पॅन कार्ड काढताना तुम्हा आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. त्यावेळी जर तुम्ही आधार कार्ड असूनही ते लिंक केलं नसल्याचा खुलासा झाल्यास पॅन कार्डधारकाकडून १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. आयकर विभागाच्या नियमांनुसार सेक्शन २७२ बी अंतर्गत हा दंड आकरण्यात येऊ शकतो.पॅन कार्ड वापरुन आधी केलेले सर्व व्यवहार ग्राह्य धरले जातील. नवीन पॅन कार्ड काढल्यानंतर ठराविक कालमर्यादेमध्ये तुम्ही आधार आणि पॅन लिंक केल्यास तुमचे पॅन कार्ड पुन्हा सक्रीय होईल. जर तुम्ही आयकर परताव्यासाठी अर्ज केला नसेल तर अशा प्रकरणामध्ये तुम्हाला कालमर्यादा ओलांडून गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज दाखल करता येणार नाही. आयकर विभागाच्या वेबसाईटवर पॅन आणि आधार लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page