top of page
Search

दहावी स्टेट बोर्डाचा निकाल ९५.३० टक्के

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jul 29, 2020
  • 1 min read

कोकण अव्वल ; मुलींची बाजी

पुणे /प्रतिनिधी

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तर औरंगाबाद मंडळाचा निकाल सर्वात कमी लागला आहे .राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल यावर्षी  १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे. राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत .निकालाची विभागनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे : कोकण - ९८.७७ टक्के.पुणे- ९७.३४ टक्के.कोल्हापूर -९७.६४ टक्के.अमरावती - ९५.१४ टक्के.नागपूर - ९३.८४ टक्के.मुंबई- ९६.७२ टक्के.लातूर - ९३.०७ टक्के.नाशिक - ९३.७३ टक्के.औरंगाबाद - ९२ टक्के.मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२० पर्यंत असून छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२० पर्यंत असणार आहे.www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page