top of page
Search

चीनी मालावर बहिष्कार ; नुकसान कुणाचे ?

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jun 23, 2020
  • 1 min read

भावनेच्या पुरात वाहून न जाणाऱ्या विचारी नागरिकांना हे आता पटेल की चीनमधील उत्पादनावर बहिष्कार घालता येणार नाही, कारण तसा बहिष्कार घातला तर भारतातील लक्षावधी उद्योग बंद पडतील, जीडीपीवर परिणाम होईल, रोजगार बुडतील. कारण अनेक भारतीय उद्योगांचा चिनी मालावरचे अवलंबित्व अंशतः नाही तर संपूर्ण आहे.(१)ज्या भारतीय औषध उद्योगाचा आपण अभिमान बाळगत, तो उद्योग ९० % कच्चा माल चीनमधून आयात करतो.(२)ज्या सौर ऊर्जा क्षेत्रातील क्षमतेचा उच्चांक गाठण्याचा आपण अभिमान बाळगतो त्यातील ८५% सौर सेल्स व इतर उपकरणे आपण चीनमधून आयात करतो (३)इलेक्ट्रॉनिक्स चिप्स, फटाके व खाणीत लागणारी स्फोटके मोठ्याप्रमाणावर; अगदी कोरोना योध्यांना लागणारे मास्क , पीपीई आणि रोग्यांसाठी व्हेन्टिलेटर्स चीनमधून येतात.(४)  त्याशिवाय भारतीय पायाभूत क्षेत्र, भारतातील स्टार्ट अप्स यांच्यात चीनची लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.मुद्दा चीनकडून आयात करू नये हा नाही हे लक्षात घ्या ; मुद्दा चीनवर आपले अनेक उद्योग पूर्णांशाने अवलंबून ठेवण्याचा आहे. याच्या मुळात गेल्यावर कळते की ज्याच्याशी ताणतणावाचा इतिहास आहे ; जो आपल्याला आशियातील आणि या शतकातील प्रतिस्पर्धि मानतो, त्या राष्ट्रावरचे असे अवलंबित्व, याकडे धोरणकर्त्यांचे असे दुर्लक्ष कसे झाले? याचे उत्तर आहे ब्लॅक सुटेड बुटेड, मोठ्या कॉर्पोरेटसट्च्या हितसंबंधांसाठी काम करणाऱ्या अर्थतज्ञांनी राष्ट्रीय , जागतिक अर्थव्यवस्था कशा चालवायच्या याची धोरणे ठरवली. साऱ्या अर्थव्यवस्थेची रचना उत्पादन खर्च कमीत कमी कसा ठेवता येईल (खरेतर नफा जास्तीत जास्त कसा मिळवता येईल) अशी करायची बाकी सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय निकष दुय्यम, मूर्खपणाचे हे फक्त भारतापुरते नाही: आज कोरोनामुळे जागतिकीकरणाचे “ग्लोबल व्हॅल्यू चेन”वर आधारित चार दशकांचे मॉडेल चार महिन्यात कोसळले. कारण जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या ईर्ष्येने एवढे आंधळे व्हायचे की त्या मॉडेलमध्ये दिसणाऱ्या जोखीमींकडे डोळेझाक करायची. स्वतःचे दीर्घकालीन हित ज्यांना कळत नाही ती माणसे श्रमिक, पर्यावरण, एकूण समाज , पुढच्या पिढ्या यांचे हितसंबंध काय बोडकं संभाळणार ?

-संजीव चांदोरकर 

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page