कसे येणार रामराज्य ?
- lokpatra2016
- Aug 5, 2020
- 5 min read

अयोध्येत राममंदिराचा शिलान्यास करताना मोदींनी रामराज्य निर्माणाचा संकल्प केला आहे.रामराज्य म्हणजे सत्य युग.मोदींच्या तोंडून सत्ययुगाची भाषा म्हणजे भुतामुखी भागवतच.मोदींनी ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत ऐकवले.वेष अर्थात साधूचा आणि परिवेष अर्थातच संधीसाधू सैतानाचा होता.मोदींनी यावेळी गांधीजींच्या संकल्पनेतील रामराज्य आणण्याची भाषा केली असली तरी त्यांच्या मनात मात्र गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मधलेच रामराज्य आहे.त्यासाठी पुरावे शोधण्याची गरज नाही.पाप मोदींच्या डोळ्यात दिसते.आज वाढलेल्या दाढी आणि भगव्या छाटीतही डोळ्यातले ते पाप लपलेले नव्हते.आज अनेक नमोरुग्ण मोदीभक्त 'जितम मया' म्हणत हर्षोन्मादात टाळ्या पिटत असले तरी हा विजय सत्यमार्गाने मिळालेला नाही हे कटूसत्य आहे.
मोदींनी न्यायालयीन प्रक्रियेतून राम मंदिराचा तोडगा काढला असे जे म्हटले जाते तेही असत्यच आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल,असा निर्णय दिला.रंजन गोगई यांच्या सारख्या आयुष्यभर निस्पृहतेने काम केलेल्या न्यायाधीशाने असा एकांगी निर्णय कसा दिला या मागची कथा 'वाली बळी'इतकीच कलंकित आहे. गोगाईंच्या निकालात ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्धवस्त करण्यात आलेल्या बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा निर्मोही आखाड्याला बहाल करण्यात आली तर मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र ५ एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यामुळे अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला.स्वातंत्र्यपूर्व काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राम जन्मभूमी, बाबरी मस्जिद प्रकरणाने धार्मिक रंग घेतले. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात या ना त्या रूपाने हा विषय सतत केंद्रस्थानी राहिला.अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद १०६ वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. ऐतिहासिक दस्तावेजानुसार, १५ व्या शतकात सुमारे ४९२ वर्षांपूर्वी बाबराने अयोध्येतील राम मंदिर पाडून तिथे मशीद बांधली.एक प्रवाह असाही आहे की येथे राम मंदिर नव्हे तर बौद्ध धम्माचा अनुयायी असलेल्या साकेत राजाची राजधानी होती.पण हा सगळा इतिहास आता पुसला गेला आहे.येथे आता रामाचे मंदिर बनेल.मोदींनी या संकल्पित मंदिराची मुहूर्तमेढ रोवली आहे.सत्तेचा अत्यंत अट्टाहासी वापर मोदींनी केला.हिंदूंना वादग्रस्त जागा बहाल करून त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याची परवानगी देणारे न्यायमूर्ती रंजन गोगई आता न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आहेत आणि भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आहेत.रामायणात वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा उल्लेख आहे.इथे वाल्मिकीचा वाल्या झाला. निकाल देण्याच्या काही महिने आधी त्यांच्यावर एका सहकारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.तेही आता मागे घेतले गेले आहेत.राम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते की मोदींनी जाणीवपूर्वक हा मोका साधला माहित नाही.पण या निमित्ताने मोदींनी राम मंदिर निर्माणाचे संपूर्ण श्रेय स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले.ज्या लालकृष्ण आडवाणी यांनी राम मंदिर आंदोलनात आपली राजकीय सद्दी घालवली त्या अडवाणींना मोदी लिमिटेड झालेल्या या कार्यक्रमात प्रवेश नव्हता.अडवाणीच काय स्वतः मोदी,रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा निर्मोही आखाड्याचे प्रमुख नृत्यगोपाल वगळता अन्य कोणाला तिथे पाय ठेवायला सुद्धा मज्जाव होता.कारण अर्थातच सुरक्षा आणि कोरोनाचे सांगितले गेले.मंदिर रामाचे आणि विचार मोदींचे.मोदींचा आजचा अवतार साधूचा होता.पण हे साधुत्व संधी साधूचे होते.मोदींची लांब वाढलेली दाढी हे सुद्धा ढोंगच.ज्याच्या मनात खोट असते त्यालाच असे सोंग ढोंग करावे लागते.मंदिराच्या पायात चांदी-सोन्याच्या रचल्या काय किंवा करोडो रुपये मातीत घालून दगडाचे भव्य मंदिर उभारले तरी त्यातला राम दगडाचाच असेल.मोदींनी कितीही आळवून सांगितले तरी इथे रामराज्य येणार नाही.रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली होती,खारीलाही तिचा वाटा दिला होता. इथे मोदी श्रेयात वाटेकरी नकोत म्हणून शिवसेनेने दिलेले एक कोटी रुपये आणि काँग्रेसने पाठवलेल्या चांदीच्या विटा नाकारतात.रामाने वानरांना गळ्याशी लावले होते.इथे मोदी कोणालाच कार्यक्रमस्थळी फिरकू देत नाहीत.रामाचा दुसरा अर्थ सत्य आहे.इथे मोदी प्रत्येक शब्द खोटा बोलतात.प्रभुरामचंद्रानी प्रजेतील एका परिटाने आक्षेप घेतला म्हणून प्रिय पत्नी सीतेचा त्याग केला होता.इथे मोदी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी साम दाम दंड भेद नीती वापरतात.त्यांना देशद्रोही ठरवतात.रामाने वचन पाळण्यासाठी एका क्षणात सत्तात्याग करून वनवास पत्करला होता,इथे मोदी विरोधी पक्षांची सरकारे खालसा करण्यासाठी सत्ता पैसा आणि ईडी सीबीआय पासून न्यायालयाचाही गैरवापर करतात.मी म्हणेल ती पूर्व दिशा ही रावणाची नीती होती.मोदींची नीती हीच आहे.त्यांना दहा तोंडे आहेत.त्यातून ते पाहिजे त्या भूलथापा देत असतात.कसे येणार रामराज्य ?

Comments