कोरोनावर 'बाबा'की जडीबुटी
- lokpatra2016
- Jun 23, 2020
- 2 min read

नवी दिल्ली /वृत्तसंस्था
संपूर्ण जगाला भंडावून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसवर रामदेव बाबांच्या 'पतंजली'ने आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा केला आहे.पतंजलीचे प्रमुख आणि योगगुरु रामदेव बाबा यांनी 'कोरोनिल' हे औषध
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १०० टक्के यशस्वी ठरत असल्याचे म्हटले आहे.या औषधाच्या साहाय्याने तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असा दवा रामदेव बाबांनी यावेळी केला. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. मंगळवारी नवी दिल्लीत पतंजलीच्या 'कोरोनिल' या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधीच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम पार पडला. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक लोक दिसले. परंतु, यापैंकी बहुतेकांनी मास्क वापरण्याची तसदी घेतलेली नव्हती.शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियमही येथे धाब्यावर बसवण्यात आलेले दिसले.योगगुरु रामदेव पत्रकार परिषदेसाठी मंचावर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण हेदेखील होते. तसेच या औषधावर काम करणारे प्रोफेसर तोमर आणि आणखी काही लोक मंचावर उपस्थित राहिले. मात्र यापैंकी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन्सनुसार, सार्वजनिक स्थळ किंवा एकाहून अधिक लोक असतील अशा ठिकाणी मास्क परिधान करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना येथे मात्र या निर्बंधांना तिलांजली देण्यात आली. बाबा रामदेवांनी केलेल्या दाव्यानुसार, या औषधामुळे कोरोनाच्या माइल्ड पासून मॉडरेट केसेसपर्यंत रुग्ण बरे होण्यासाठी ३ ते ७ दिवस लागतात. पतंजली 'दिव्य करोना किट'मध्ये कोरोनिल, श्वसारि वटी आणि अणु तेल यांचा समावेश आहे.या औषधीत गिलोय,अश्वगंधा,तुळशी,स्वासारी रस,आणि अनु तेलाचे मिश्रण असल्याचे यावेळी आयुर्वेदाचार्य बालकृष्णन यांनी सांगितले.कोरोनीलचे सर्व औषधीचे पॅकेज फक्त ५४५ रुपयात असल्याचे यावेळी सांगण्यात आले भारतात आयुर्वेदिक औषधांना मंजुरी देण्याची जबाबदारी आयुष मंत्रालयाची आहे. 'सेंट्रल काऊंन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस' पूर्ण प्रक्रियेवर नजर राखते. तर, एलोपॅथिक औषधांना 'डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस' अंतर्गत येणाऱ्या 'सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन' कडून मंजुरी देण्यात येते. पतंजलीच्या 'कोरोनिल'ला या औषधाला मात्र अद्याप सरकारकडून परवानगी मिळालेली नाही.या औषधाचं प्रोडक्शन हरिद्वारची दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडने केले आहे. दरम्यान या औषधांबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना, बाजारात अनेकजण करोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध आणले असेल तर ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते घ्यावे असे म्हटले आहे.
Comments