कोरोनामुळे रक्षाबंधनाच्या बाजारात शुकशुकाट
- lokpatra2016
- Aug 3, 2020
- 1 min read

परतूर / एम एल कुरेशी.
रक्षाबंधन या सणाचे भारतीय संस्कृतीमध्ये आनन्य साधारण महत्व आहे बहीण भावाच्या हाताला राखी बांधून स्वतःचे रक्षण करण्याची मागणी भावाला करते, तो पवित्र सण आज दिनांक 03 ऑगस्ट रोजी सोमवारी साजरा होत आहे,
या सणाला भाऊ आपल्या बहिणीकडे राखी बांधायला येतो, भारतात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो, बाजारपेठेत दुकाने वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांनी सजलेले असतात, परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा मोठा फटका दुकानदारांना बसला आहे, परतूर शहर व परिसराच्या बाजारपेठेत याचा परिणाम दिसून येत आहे, रक्षाबंधन सणाच्या आठ दिवस अगोदर पासूनच महिला, मुली आपल्या आवडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या राख्या आपल्या भावाला बांधण्यास गर्दी करीत असतात, परंतु या वेळेस शहरातील बाजारपेठेत कोरोनामुळे शुकशुकाट दिसत आहे, यावर्षी कोरोनाचा प्रकोप वाढल्याने, राख्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे,
जे ग्राहक खरेदीसाठी दुकानात येत आहेत सोशल डिस्टन्स ठेवून राख्या खरेदी करताहेत, मागील काही दिवसा पुर्वी मास्क न वापरणारयांवर पालिके तर्फे कारवाई करण्यात आल्याने बहुसंख्य लोकं नाका तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधूनच बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत, रक्षाबंधन सणाला जसे राख्यांचे महत्त्व तसेच पेढे खरेदीचे ही महत्व असल्याने बाजारपेठेत मिठाईच्या दुकानांवर ही नागरीक गर्दी करताना दिसत नाहीत, दरवर्षी मोठ्या प्रमाणावर राख्यांनी सजणारी दुकाने कोरोना मुळे सजलेल्या नाहीत, तर अनेकांनी या वर्षी आपल्या दुकानात कमी प्रमाणात राख्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत, त्याबाबत दुकानदारांनी सांगितले की, असे पहिलेच वर्ष असेल की आम्ही आमच्या दुकानात राख्या व इतर साहित्य विक्रीसाठी कमी प्रमाणात मागवले आहे, आमच्या व्यवसायावर कोरोनाचा मोठा परिणाम झाला असून, यावर्षीच्या सणावर कोरोनाचे सावट आहे, शहरातील नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेत शुक-शुकाट दिसत आहे.
Comentarios