कोरोनामुक्ती ही आता सामाजिक जबाबदारी
- lokpatra2016
- Jun 26, 2020
- 1 min read
कोरोनामुक्ती ही आता सामाजिक जबाबदारी

आता ह्या टप्प्यात इन्फेक्शन वाढण्याचा प्रमाण हे धोकादायक वळणावर येऊन ठेपल आहे ! कम्युनिटी ट्रान्सफर मधे गेलो आहोत हे आता लपून राहिलेले नाही आहे तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही हे कित्येक लोकांना माहीत असून त्याच्या 4 पट इन्फेक्शन हे आपण लॉकडाऊन अण्लॉक करताना करून घेतला आहे आता कोरोनामुक्त हे फक्त प्रशासनाचीच जबाबदारी नसून ही आता प्रत्येक नागरिकांची स्वतःची जबाबदारी समजून रहावे अशी ही वेळ आहे ! त्यात मी आता काही उपाय सुचवत आहे ते असे
1 - किराणा दुकान ह्यांनी आता फक्त अपोइण्टमेंट बेसवर कामे आणी व्यवहार करावा .. शक्य असेल तर व्हाट्सअप वर किराणा मालाची यादी ऐक दिवस सोयीनुसार बनवून पाठवावी जेणेकरून दुकानात प्रत्यक्ष गर्दी कमी होईल आणी धोका होणार नाही आणी पेमेंट ऑनलाइन करावे आणी होम डिलिव्हरीचा अवलंब करावा , आपल्याला गर्दी डिव्हाईड करायची आहे ! त्याप्रमाणे वागले तरच आपण आपला जीव वाचवू शकतो हे समजले पाहिजे !
2-प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहे तेव्हा नागरिकांनी स्वतः गट बनवून आपल्या भवतालचा एरिया कसा सुरक्षित राहील ह्यावर जोर दिला पाहिजे ! ह्या रोगाची नेमकी हाताळणी आणी अनुभव प्रशासनाला नाही हे समजून आपणच योग्य खबरदारी घेऊन काही सुरक्षा नियम स्वतः अवलंबले पाहिजे
अभिजीत वाघमारे
औरंगाबाद
Comments