औरंगाबादेत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन
- lokpatra2016
- Aug 11, 2020
- 1 min read

राजकीय पक्षाकडून खाऊगिरी करणाऱ्या महाठगांना रंगेहात पकडून धडा शिकवणार : रमेश केरे पाटील
औरंगाबाद /प्रतिनिधी
मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने क्रांती चौकात गेल्या चार दिवसांपासून ठिय्या व निदर्शन आंदोलन करण्यात येत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गोरगरीबांना प्रमुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मात्र, त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले गेले.मागील सरकारने फक्त थापा मारल्या तर हे सरकार लक्षच द्यायला तयार नाही.म्हणून आम्ही आंदोलन सुरु केले आहे असे आंदोलकातील समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा क्रांती मोर्चात मतभेद आणि गट पडल्याचे त्यांनी मान्य केले. दोन गटात काही मुद्यावरून मतभेद आहेत. उद्देश मात्र,एकच आहेत. असे असले तरी काही महाठग समाजाच्या नावाने आंदोलन करून राजकीय पक्षांकडून खाऊपणा करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अशा महाठग मराठा समन्वयकांना रंगेहात पकडून समाजासमोर त्यांचा चेहरा उघडा करण्यासाठी काही सुज्ञ मराठा समन्वयक कामाला लागल्याचेही केरे पाटील यावेळी म्हणाले.सरकार कोणत्या पक्षाचे या बद्दल मराठा समाजाला काही देणे घेणे नाही. जो मराठा समाजाचे प्रश्न तातडीने सोडवेल त्याचा पाठीमागे मराठा समाज उभा राहतो.त्यामुळे आंदोलनात राजकारण कुणी आणू नये, असे आवाहन केरे पाटील यांनी केले आहे.
===========
Comments