आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रिपाई आठवले पक्षाची मागणी.
- lokpatra2016
- Jun 16, 2020
- 1 min read

पिंपरी चिंचवड पुणे येथील विराज जगताप व नागपूर येथील अरविंद बनसोडे हत्या प्रकरणी आरोपींना फाशी देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने पैठण तहसीलदार यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
बौद्ध वर महाराष्ट्र मध्ये अमानुष हल्ला केला जातोय प्रेम प्रकराणा मधुन ही पुणे या सारख्या ठिकाणी तरुणाची हत्या करण्यात आली, त्यामुळे नागपूर येथील घटनेचा पिंपरी चिंचवड, बिड येथील पारधी कुटुंबातील तिहेरी हत्या काड हया घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला, संबंधित तिन्ही घटनेचा तपास करून जलद गती न्यायालयात खटला दाखल करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पैठण तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी मराठवाडा प्रदेश संघटक अमोल नरवडे,जिल्हा उपाध्यक्ष सुनिल आडसुल,जगन्नाथ साळवे,दादा सोनवणे,राम निकाळजे,करण पटेकर,अमर गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Comentários