अग्रिमा जोशुआला धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करताना अभिनेत्री स्वरा भास्कर
- lokpatra2016
- Jul 12, 2020
- 2 min read

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल शनिवारी जाहीर माफी मागितली आहे. एका स्टँडअप शोदरम्यान जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जोशुआचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला त्यानंतर तीने समोर येत याप्रकरणी ट्विटवरुन माफी मागितली. मात्र आता याच प्रकरणाने एक नवं वळणं घेतलं आहे. जोशुआला विरोध करताना एका तरुणाने थेट तिला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भातील ट्विट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं आहे.
इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला आहे. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. तसेच त्याने इतरांनाही असं करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात राहणारी एक महिला म्हणून अशाप्रकारे बलात्काराची धमकी देणारे मोकाट फिरत असल्याने माला भिती वाटत आहे. यासंदर्भात काहीतरी करा,” असं ट्विट स्वराने देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याची माहिती देणाऱ्या ट्विटवर केलं आहे.
Sir Instagram influencer by name Shubham Mishra/ Badass Shubham in video posted on @instagram threatened publicly 2 rape #AgrimaJoshua & has incited other men to do same. As a woman living in Maharashtra I feel unsafe that an admitted rapist is roaming free! Pls look into it https://t.co/Qx42e9932j — Swara Bhasker (@ReallySwara) July 11, 2020
स्वराने या शुभम नावाच्या व्यक्तीने पोस्ट केलेला व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये शुभम अत्यंत अश्लील भाषेत जोशुआबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना स्वराने अनिल देशमुख यांना टॅग केलं आहे. “माननीय अनिल देशमुख सर एखादा अपमानास्पद विनोद केला म्हणून थेट सार्वजनिकरित्या एखाद्या महिलेला अशी धमकी देणं योग्य आहे का? हा शुभम मिश्रा उघडपणे बलात्काराची धमकी देऊन इतरांनाही तसं करण्यास सांगत आहे. हा आयपीसी कलम ५०३ अंतर्गत गुन्हा आहे. तुम्ही या प्रकरणात मुंबई पोलिसांना करावाई करण्याचे आदेश द्याल का?” असं स्वराने हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटलं आहे.
हे प्रकरण तापल्यानंतर शुभमने माफी मागितली आहे. “माझ्या मागील व्हिडिओमध्ये बलात्काराची धमकी देण्याचा माझा उद्देश नव्हता. मात्र काही लोकांना असं वाटल्याने मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे,” असं शुभमने म्हटलं आहे.
मात्र यावरुनही स्वराने त्याला सुनावलं असून “बालात्काराची धमकी देण्याचा हेतू नव्हता तर अगदी सविस्तरपणे बलात्कार करण्यासंदर्भातील वक्तव्य का केलं?” असा प्रश्न विचारला आहे. या देशातील महिला म्हणजे थुंकण्याची जागा नाहीय मनात आलं तेव्हा थुंकला आणि निघून गेला असा टोलाही स्वराने लगावला आहे.
Comentarios