top of page
Search

अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु 

  • Writer: lokpatra2016
    lokpatra2016
  • Jul 26, 2020
  • 1 min read


प्रतीक्षा स्टेटबोर्डच्या निकालाची  पुणे /प्रतिनिधी राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे  विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी २६  जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करु शकतील. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी आणि पासवर्डही काढता येईल. त्याचबरोबर प्रवेश अर्जातील पहिला भाग एक ऑगस्ट पासून भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि केंद्रीय प्रवेश समितीकडून राबवले जाते. सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असला तरी राज्य मंडळाचा निकाल लागणे आजून बाकी आहे . तो जाहीर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील पहिला भाग भरण्यास उपलब्ध करुन दिला जाईल, असे  शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आले  आहे. दहावीचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५  जुलै रोजी सुरु होणार होती. पण पुणे, पिपंरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्याने २६  जुलै रोजी  ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरता येईल, असे  माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाने सांगितले होते. मात्र, राज्य मंडळाचा दहावीचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाचा पहिला भाग १  ऑगस्ट रोजी भरता येईल, असे   माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले  आहे. याशिवाय आजपासून विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करु शकतील, असे  स्पष्ट करण्यात आले  आहे. दरम्यान, राज्य मंडळाचा दहावीचा निकाल कधी लागेल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. “कोरोना संकटामुळे दहावीच्या भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, या काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकल्या होत्या. बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता दहावीचादेखील निकाल जाहीर होईल.३१ जुलै पर्यंत  दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असे  वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

 
 
 

Comments


Post: Blog2_Post

9623695024

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by mh 20 lokpatra. Proudly created with Wix.com

bottom of page